मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात परनो रिकार्ड इंडियाचे नॅशनल हेड (कॉर्पोरेट अफेयर्स) आणि एक्झिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर प्रसन्ना मोहिले यांची प्रसिद्ध मराठी यूट्यूबर अंकीता वालावलकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी मोहिले यांनी कंपनीची भारतातील वाटचाल, विदर्भातील नवीन प्रकल्प तसेच सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली.
मोहिले म्हणाले की, लोकमत आणि दर्डा परिवाराशी आमचे जुने संबंध आहेत. २०१५-१६ पासून परनो रिकार्ड लोकमतसोबत जोडले गेले आहे. ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ या मानाच्या उपक्रमाशी परनो रिकार्ड जोडले गेले असल्याचा अभिमान आहे.
कंपनीच्या भारतातील प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले की, परनो रिकार्ड ही जरी फ्रेंच कंपनी असली तरी भारतात सुमारे ३० वर्षांपूर्वी छोट्या स्वरूपात सुरुवात झाली. आज देशात कंपनीचे २४ उत्पादन प्रकल्प असून विस्ताराची प्रक्रिया सुरू आहे. मी नागपूरकर असल्याने माझे मन नेहमी नागपूरसाठी धडधडते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने नागपूरमध्ये आशियातील पहिला माल्ट डिस्टिलरी व मॅच्युरेशन फॅसिलिटी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कंपनीमार्फत सुमारे ९ लाख रोजगार निर्माण झाले असून त्यापैकी ६ लाख रोजगार कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत, असेही मोहिले यांनी सांगितले.
Web Summary : Pernod Ricard India's National Head, Prasanna Mohile, expressed pride in associating with 'Maharashtrian of the Year'. He highlighted the company's 30-year journey in India, its expansion plans including a new project in Nagpur benefiting 90,000 farmers and generating 9 lakh jobs, largely in agriculture.
Web Summary : पर्नोड रिकार्ड इंडिया के राष्ट्रीय प्रमुख प्रसन्ना मोहिते ने 'महाराष्ट्रियन ऑफ द ईयर' से जुड़ने पर गर्व व्यक्त किया। उन्होंने भारत में कंपनी की 30 साल की यात्रा, नागपुर में 90,000 किसानों को लाभान्वित करने वाली एक नई परियोजना और कृषि क्षेत्र में 9 लाख रोजगार सृजित करने की योजनाओं पर प्रकाश डाला।