सरकारचा निषेध करीत फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:08 IST2021-07-07T04:08:25+5:302021-07-07T04:08:25+5:30
वांद्रेतील चर्चसमोर मूक निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फादर स्टेन स्वामी यांचा मृतदेह सेंट झेवियर्स कॉलेजच्या ताब्यात देण्यात ...

सरकारचा निषेध करीत फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली
वांद्रेतील चर्चसमोर मूक निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फादर स्टेन स्वामी यांचा मृतदेह सेंट झेवियर्स कॉलेजच्या ताब्यात देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी वांद्रे येथील सेंट जोसेफ चर्चच्या बाहेर विविध संघटनांकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ कोरोनाचे नियम पाळून सरकारचा निषेध करण्यात आला. हातात फलक घेऊन नागरिक मोठ्या संख्येने जमले होते.
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी कोठडीत असलेल्या फादर स्टेन स्वामी यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात कोणी नातेवाईक नसल्याने त्यांचा मृतदेह सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राध्यापकांकडे सुपूर्त करण्यात आला. तर, स्वामी यांना वांद्रे येथील सेंट जोसेफ चर्चच्या बाहेर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जमात-ए-इस्लामी हिंद, एपीसीआर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. सलीम खान, अस्लम गाझी, शकीर शेख, फिरोज मिठीबोरवाला आदींचा समावेश होता.