एकनाथ खडसे यांना ३ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:31 IST2021-02-05T04:31:25+5:302021-02-05T04:31:25+5:30

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ...

Protection of Eknath Khadse from arrest till February 3 | एकनाथ खडसे यांना ३ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

एकनाथ खडसे यांना ३ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ३ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून देण्यात आलेल्या संरक्षणात वाढ करण्यात आली.

‘ईडी’ने बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. मात्र, ही याचिका सुनावणीला आली नाही. अखेर खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी याचिका सुनावणीस असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी ठेवली. त्यामुळे खडसे यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाच्या मुदतीतही ३ फेब्रुवारीपर्यंत आपोआप वाढ झाली.

सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने ऑक्टोबर २०२० मध्ये नोंदविलेला ईसीआयआर रद्द करण्यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत खडसे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ‘ईडी’ला द्यावेत, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

...........................................

Web Title: Protection of Eknath Khadse from arrest till February 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.