शेजा-यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By Admin | Updated: December 25, 2014 22:19 IST2014-12-25T22:19:41+5:302014-12-25T22:19:41+5:30

पनवेलच्या नवनाथनगर वसाहतीत राहणाऱ्या प्रकाश अवधूत चव्हाण (३५) याने किरकोळ कारणावरुन शेजारी राहणा-या अब्बास अकबर कुरेशी (३८) यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली

Prosecutors assault Cheja | शेजा-यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

शेजा-यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

पनवेल : पनवेलच्या नवनाथनगर वसाहतीत राहणाऱ्या प्रकाश अवधूत चव्हाण (३५) याने किरकोळ कारणावरुन शेजारी राहणा-या अब्बास अकबर कुरेशी (३८) यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी प्रकाश चव्हाण यांच्यावर ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दरम्यान, या घटनेत अब्बास कुरेशी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेतील आरोपी प्रकाश चव्हाण आणि जखमी अब्बास कुरेशी ही दोघेही पनवेलमधील नवनाथनगर वसाहतीत राहावयास असून दोघेही शेजारीच राहावयास आहेत. मागील चार दिवसांपूर्वी प्रकाश आणि अब्बासची पत्नी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर अब्बास प्रकाश चव्हाणला समजावण्यासाठी गेला होता. मात्र प्रकाशने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन अब्बासवर कोयत्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)

Web Title: Prosecutors assault Cheja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.