प्राण्यांपासून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले

By Admin | Updated: February 8, 2015 00:32 IST2015-02-08T00:32:55+5:302015-02-08T00:32:55+5:30

प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर संसर्गाने मानवाला होणाऱ्या आजारांना ‘झूनोसिस’ असे म्हटले जाते. बरेचदा झूनोसिसमुळे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.

The proportion of diseases spread from animals increased | प्राण्यांपासून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले

प्राण्यांपासून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले

मुंबई : प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर संसर्गाने मानवाला होणाऱ्या आजारांना ‘झूनोसिस’ असे म्हटले जाते. बरेचदा झूनोसिसमुळे मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात अपंगत्व येण्याचा किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. मानवी संसर्गामध्ये सुमारे ६० टक्के आजार हे झूनोसिसमुळे पसरत आहेत़ पुढच्या काळात याचा धोका वाढू शकतो, असे मत डॉक्टरांनी शनिवारी केईएम रुग्णालयात झालेल्या ‘झूनोटिक आजार, मानवी संबंध, प्रतिबंध, नियंत्रण आणि जागरूकता’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात मांडले.
भविष्यात येऊ घातलेल्या १७५ येऊ घातलेल्या आजारांत १३२ (७५ टक्के) हे झूनोटिक आहेत. उंदीर, कुत्री, मांजर, डुक्कर, मेंढ्या आणि बकऱ्या, घोडा, वटवाघूळ, ससे यांच्या संपर्कात मानव आल्यान संसर्ग होऊन विविध आजार होतात, अशी माहिती मिलेनियम इंडिया एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उदय ककरू यांनी दिली.
भारतात अनेक प्रकारचे प्राणी पाळीव आहेत. पण आपल्या देशात कुठेही, कोणत्याप्रकारे प्राण्यांची नोंदणी होत नाही. त्याचबरोबर या प्राण्यांचे कोठेही स्थलांतर करता येते. यावेळी प्राण्यांना कोणाता आजार झाला असेल तर त्याची माहिती ठेवता येत नाही. हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते, असे बॉम्बे वेटरनरी रुग्णालयाचे साहाय्यक अधिष्ठाता डॉ. आशिष पातूरकर यांनी सांगितले. प्राण्यांवर उपचार करणारे डॉक्टर आणि माणसांवर उपचार करणारे डॉक्टर यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत ही डॉ. पातूरकर यांनी मांडले.
मानवी आहारात येणारे अन्नघटक प्राण्यांपासून येतात ज्यामध्ये दूध, अंडी, मासे, चिकन इत्यादीचा समावेश असतो. प्राण्यांना एखादा आजार असल्यास त्याची ही नोंद ठेवली जात नाही. यामुळे हे अन्नघटक खाल्ल्याने आवश्यक पोषकद्रव्ये मिळत नाहीत; पण माणस आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वेळीच सावध होण्याची आवश्यकता
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दररोज 50 हजार रुग्णांना मृत्यू हा झुनोसिसमुळे झालेल्या संसगार्मुळे होतो. तर, इंडियन वेटर्नरी रिसर्च सेंटरच्या (उत्तर प्रदेश) पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रमेश सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात प्राण्यांमुळे माणसाला होणाऱ्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असून यासाठी वेळीच सावधान होऊन उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The proportion of diseases spread from animals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.