ठाण्यात भरणार प्रॉपर्टी प्रदर्शन-२०१५

By Admin | Updated: January 8, 2015 22:48 IST2015-01-08T22:48:47+5:302015-01-08T22:48:47+5:30

एमसीएचआय-क्रेडाय ठाणे प्रॉपर्टी एक्स्पोच्या वतीने यंदाही प्रॉपर्टी-२०१५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले

Property performance in Thane: | ठाण्यात भरणार प्रॉपर्टी प्रदर्शन-२०१५

ठाण्यात भरणार प्रॉपर्टी प्रदर्शन-२०१५

ठाणे : एमसीएचआय-क्रेडाय ठाणे प्रॉपर्टी एक्स्पोच्या वतीने यंदाही प्रॉपर्टी-२०१५ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एमसीएचआयचे अध्यक्ष सुरज परमार यांनी दिली. येत्या १६ ते १९ जानेवारीदरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
तसेच आॅनलाइन प्रदर्शन कोलशेत, ढोकाळी येथील हायलॅण्ड गार्डन येथे करण्यात आले असून १६ जानेवारीला या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन, सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वासिंद, आसनगाव आदी भागांतील सुमारे १०० स्टॉल येथे उपलब्ध असणार आहेत. यामध्ये २० पेक्षा अधिक हाऊसिंग फायनान्स कंपन्या आणि बँकादेखील सहभागी होणार आहेत.
ग्राहकांसाठी गृहकर्जावर विशेष आॅफर्स आणि तत्क्षणी मंजुरी या खास सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांना खिशाला परवडणारी घरेदेखील उपलब्ध असणार असल्याची माहिती एमसीएचआयचे सचिव सचिन मिराणी यांनी दिली. तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांना प्रवेश शुल्क ३० रुपये आकारण्यात येणार असले तरी आॅनलाइन नोंदणी करणाऱ्यांसाठी शुल्क आकारले जाणार नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

प्रदर्शनात वैभवशाली प्रकल्पांचा समावेश
४विशेष म्हणजे केवळ चार दिवस असलेले हे प्रदर्शन प्रत्यक्षात ३६० दिवस आठवड्याच्या सातही दिवशी २४ तास आॅनलाइन उपलब्ध असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
४याशिवाय, या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या परवडणाऱ्या वैभवशाली प्रकल्पांचा समावेश असणार असून रिअ‍ॅलिटी क्षेत्रात हा कल वेगाने मूळ धरत आहे.
४हा कल जितका अधिक रुजेल, तितकी आसपासच्या भागात दर्जेदार जीवनशैली अपेक्षित असलेल्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Property performance in Thane:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.