मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला; एका अधिकाऱ्यावर मेहेरबानी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 07:29 AM2020-08-29T07:29:17+5:302020-08-29T07:29:23+5:30

प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी काढण्यात आला आहे.

The promotion of motor vehicle inspectors got a moment | मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला; एका अधिकाऱ्यावर मेहेरबानी का?

मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीला मुहूर्त मिळाला; एका अधिकाऱ्यावर मेहेरबानी का?

Next

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अनेक पदे रिक्त असून त्यावर पात्र अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी २४ मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती यादी तयार करण्यात आली होती. पण त्यामधील काही जणांना निवृत्तीच्या तोंडावर पदोन्नती मिळाली होती. उर्वरित अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक या पदावरील २४ अधिकाऱ्यांना साहाय्यक परिवहन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्याचा आदेश २९ जून २०२० रोजी काढण्यात आला आहे. यातील दोन अधिकारी ३० जून रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांना पदस्थापना देण्यात आली होती. त्यामुळे आपल्याला पदोन्नती मिळेल की निवृत्तीपर्यंत वाट पाहावी लागणार, याची चिंता अधिकाºयांना होती.

एका अधिकाऱ्यावर मेहेरबानी का?
शासकीय नियमानुसार एक अधिकारी एका ठिकाणी जास्तीत जास्त तीन वर्षे असायला हवा. पण नाशिक येथील एक मोटार वाहन निरीक्षक तेथे ५ वर्षांपासून होता. आता त्या अधिकाºयाला त्याच कार्यालयात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे इतर अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: The promotion of motor vehicle inspectors got a moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.