ऑक्टोबर हिटचा प्रचाराला फटका
By Admin | Updated: October 5, 2014 23:44 IST2014-10-05T23:44:23+5:302014-10-05T23:44:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी नाही; तप्त उन्हामुळे कार्यकर्त्यांंची दमछाक.

ऑक्टोबर हिटचा प्रचाराला फटका
ठाणे : नावात काय असते, असे सुप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपीयर यांनी म्हटले आहे. मात्र, जिल्ह्यातील मुरबाडमध्ये गोटीराम पवार आणि बेलापुरात मंदा म्हात्रे या उमेदवारांना त्यांच्यासारख्याच नावाच्या उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. या दोन्ही मतदारसंघांत १५ उमेदवार नशीब आजमावत असून समान नावाचे अपक्ष उमेदवार राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या किती मतांवर डल्ला मारतात, ते लवकरच समोर येईल.
ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ असून तिथे २३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुरबाडमध्ये १५ उमेदवार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून गोटीराम पदू पवार आणि अपक्ष उमेदवार गोटीराम गणू पवार असे एकाच नावाचे दोन उमेदवार आहेत. तसेच बेलापुरात १५ उमेदवार असून तेथेही भाजपाच्या मंदा विजय म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार म्हणून मंदाताई म्हात्रे या दोन उमेदवार रिंगणात आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे या एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. (प्रतिनिधी)