विकास नियोजन आराखडा लांबणीवर
By Admin | Updated: March 29, 2017 03:51 IST2017-03-29T03:51:29+5:302017-03-29T03:51:29+5:30
मुंबईच्या विकास आराखड्याचा मसुदा महापालिकेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याची मुदत आणखी दोन

विकास नियोजन आराखडा लांबणीवर
मुंबई : मुंबईच्या विकास आराखड्याचा मसुदा महापालिकेत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्याची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या आराखड्याबाबत आपले आक्षेप व सूचना पाठविण्याची संधी अद्यापही नागरिकांना खुली आहे. विलंब झालेल्या या आराखड्याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याआधी हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. परंतु मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी आराखडा लांबणीवर टाकला. आता नव्या सभागृहातील सदस्य नवीन असल्याने त्यांना या आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी मुदत देण्याची विनंती करण्यात आली. ही मुदतवाढ राज्य सरकारने मंजूर केली आहे. (प्रतिनिधी)
विकास आराखड्याच्या मसुद्यावर पुढील दोन महिन्यांत नागरिकांना आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून सूचना मांडता येतील. १९ मे २०१७ ही यासाठी शेवटची तारीख असेल.