‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत!

By Admin | Updated: March 4, 2015 20:08 IST2015-03-04T20:08:32+5:302015-03-04T20:08:32+5:30

फँड्री फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या ५० स्वयंसेवकांनी नुकतीच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील केवनाळे या दुर्गम गावाला भेट आली.

'Project Fondry' members help the needy! | ‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत!

‘प्रोजेक्ट फँड्री’च्या सदस्यांची गरजूंना मदत!

मुंबई : ‘फँड्री फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या ५० स्वयंसेवकांनी नुकतीच पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील केवनाळे या दुर्गम गावाला भेट आली. ‘प्रोजेक्ट फँड्री’मधील सदस्यांनी गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला. तेथील परिस्थिती जाणून विविध पातळीवर गावकऱ्यांना सहकार्य करीत सामाजिक वसा जपला.
‘फँड्री फाउंडेशन’तर्फे मुंबईतील विविध भागात आवाहन करून जमविण्यात आलेले जुने परंतु वापरण्यायोग्य कपडे, साड्या लहान मुलांचे कपडे स्वयंसेवकांनी गावातील गरजू मुले,स्त्रिया व पुरुष यांना देण्यात आले. तसेच गावातील प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी पुरेशा शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अंगणवाडीतील मुलांना पाट्या, पेन्सिल व खेळणी देण्यात आली.
गावात असणाऱ्या अनेक समस्यांबाबत या सदस्यांनी जाणून घेतले.

Web Title: 'Project Fondry' members help the needy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.