सराफा बाजाराला नफेखोरीचा फटका

By Admin | Updated: June 3, 2014 00:37 IST2014-06-03T00:37:37+5:302014-06-03T00:37:37+5:30

जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी नफेखोरी करत विक्री केल्याने सोन्याचा भाव 18क् रुपयांनी घसरून 27,22क् रुपये प्रतितोळा झाला.

Profit hit by bullion market | सराफा बाजाराला नफेखोरीचा फटका

सराफा बाजाराला नफेखोरीचा फटका

>नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी नफेखोरी करत विक्री केल्याने  सोन्याचा भाव 18क् रुपयांनी घसरून 27,22क् रुपये प्रतितोळा झाला. हा चार महिन्यांचा नीचांक आहे. दुसरीकडे चांदीचा भाव 4क्,35क् रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टॉकिस्टांनी उच्च पातळीवरील सोन्याची मोठय़ा प्रमाणात विक्री केली. यामुळे या मौल्यवान धातूचा जागतिक बाजारातील भाव फेब्रुवारीच्या नीचांकी पातळीवर जाऊन पोहोचला.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.7 टक्क्यांनी कमी होऊन 1,241.11 डॉलर प्रतिऔंस राहिला. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या भावाने ही पातळी गाठली होती.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 18क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 27,22क् रुपये आणि 27,क्2क् रुपये प्रतितोळा झाला. नुकतेच चांदीच्या भावाने 11 महिन्यांची नीचांकी पातळी गाठली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव दोनशे रुपयांच्या हानीसह 24,4क्क् रुपये झाला.
दुसरीकडे मर्यादित मागणीमुळे तयार चांदीचा भाव 4क्,35क् रुपयांवर कायम राहिला, तर साप्ताहिक चांदीचा भाव 9क् रुपयांच्या घसरणीसह 39,5क्क् रुपयांवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव 2,क्क्क् रुपयांनी कोसळून 75,क्क्क् रुपये ते 76,क्क्क् रुपये या पातळीवर बंद झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर सरकारने सोमवारी सोने-चांदी यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. सोन्यावरील आयात शुल्क प्रतितोळा 4क्8 अमेरिकी डॉलर आणि चांदीवरील 617 डॉलर करण्यात आला आहे.

Web Title: Profit hit by bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.