मुंबई : ‘बॉम्बे हाय’ येथील तेल उत्पादन ७०.५४ लाख टनापर्यंत व नैसर्गिक वायू उत्पादन ३००.८६ कोटी घनमीटर वाढविले जाणार आहे. त्यासाठी ६०६८ कोटी रुपयांची गुंतवणूक मार्च २०१९ पर्यंत केली जाईल, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी राज्यमंत्री विजय गोयल यांनी दिली. गोयल यांनी अलीकडेच ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक घेतली.बॉम्बे हाय परिसरात सध्या तेलाच्या ७० विहिरी आहेत. त्यापैकी ५७ विहिरींचे खोदकाम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होत आहे. याखेरीज ४८ विहिरींची क्षमता वाढविली जात आहे. त्यासाठी ३,१९० कोटी रुपये खर्च होाणर आहेत. हे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण होईल. या सर्व विकासकामांमुळे ‘बॉम्बे हाय’ मधील एकूण साठ्यापैकी ८९.१६ टक्के कच्चे तेल इंधनाच्या निर्मितीसाठी बाहेर काढता येणार आहे. त्यातून भारतातील कच्च्या तेलाची आयात काही प्रमाणात तरी कमी करता येईल, असा दावा गोयल यांनी बैठकी वेळी केला.
बॉम्बे हायमधील उत्पादन ७० लाख टनांनी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 05:33 IST