पाणीटंचाईची समस्या कायम

By Admin | Updated: February 15, 2015 23:14 IST2015-02-15T23:14:04+5:302015-02-15T23:14:04+5:30

वसई-विरार शहर महापालिकेचा प्रभाग ७३ हा वसई रोड रेल्वे स्थानक लगत असल्याने या प्रभागाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत गेली.

The problem of water scarcity persists | पाणीटंचाईची समस्या कायम

पाणीटंचाईची समस्या कायम

वसई : वसई-विरार शहर महापालिकेचा प्रभाग ७३ हा वसई रोड रेल्वे स्थानक लगत असल्याने या प्रभागाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत गेली. आजमितीस या प्रभागात हजारो गृहनिर्माण संस्था आहेत. मात्र रहिवाशांना पाणीटंचाईच्या समस्येने घेरले आहे.
ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना टंचाईच्या काळात टँकरवाल्यांना लाखो रु द्यावे लागतात. दरवर्षी टँकर लॉबी या पाणी टंचाईचा गैरफायदा उचलत असते. उन्हाळ्याच्या तोंडावर टँकरचे भाव वाढवले जातात. पूर्वी महसूल विभाग टँकरवाल्यांची बैठक घेऊन टँकरचे दर निश्चित करत असत, परंतु आता महानगरपालिका असल्यामुळे ती प्रथा पाळली जात नाही. त्यामुळे रहिवाशांची मात्र चांगलीच ससेहोलपट होते.
प्रभागामध्ये अनधिकृत फेरीवाले, वाहतूककोंडी व जनतेसाठी बांधलेल्या पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण इ. प्रश्न आजही मार्गी लागलेले नाहीत. या प्रभागातून निवडून आलेले नितीन राऊत हे गेली अनेक वर्षे सत्तेच्या राजकारणात आहेत नगरसेवक पदाचा दिर्घकाळ अनुभव आहे. तसेच या प्रभागातील प्रत्येक समस्येची जाण आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष व आता प्रभाग समिती सभापती अशी वाटचाल करणाऱ्या राऊत हे एकमेव असे सभापती आहेत, की त्यांना सलग ५ वर्षे देण्यात ाली. रस्ते, गटारे, साफसफाई इ. विकासकामे या प्रभागात मोठ्या प्रमाणात झाली. परंतु जि.प. कडे असलेल्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा मात्र सुधारण्यात त्यांना यश मिळाले नाही. हे आरोग्य केंद्र अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे या आरोग्यकेंद्राच्या कामामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. परंतु सदर केंद्र मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामाला त्यांनी गती द्यायला हवी. खाजगी रुग्णालयाकडून जनतेची लुट होत असते त्यावर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही.

Web Title: The problem of water scarcity persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.