Join us  

बांधकाम क्षेत्रातील खासगी भांडवल घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 7:01 PM

Construction Sector : आजवरची सर्वाधिक गुंतवणूक मुंबईतील प्रकल्पांवर

मुंबई : बांधकाम व्यवसायात गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत ३ लाख ९० हजार कोटींच्या खासगी भाग भांडवलाची गुंतवणूक झाली होती. यंदा त्यात घट झाली असून हे भांडवल १ लाख ६९ हजार ३०८ कोटींपर्यंत कमी झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक ८१ टक्के भांडवल हे कार्यालयीन बांधकामांसाठी गुंतविण्यात आले रिटेल व्यवसायात शुन्य गुंतवणूक झाली आहे.  

नाईट फ्रँक या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून माहिती हाती आली आहे. गेल्या वर्षी निवासी क्षेत्रासाठी ७१७ दशलक्ष डाँलर्स भांडवल होते. ती यंदा ५६९ कोटींपर्यंत कमी झाले आहे. कार्यालयीन बांधकामांचे भांडवल २,७२५ दशलक्ष डाँलर्सवरून १८७१ इतके कमी झाले आहे. वेअरहाऊसिंग क्षेत्र विस्तारत असले तरी त्यातील गुंतवणूक १८९४ दशलक्ष डाँलर्सवरून १५३७ इतकी कमी झाली आहे. रिटेल क्षेत्रात गतवर्षी ३९७ दशलक्ष डाँलर्सचे भाडंवल होते. यंदा त्या आघाडीवर एकही व्यवहार झालेला नाही.    

आर्थिक मंदीमुळे ज्या क्षेत्रात जास्त विकास होण्याची क्षमता आहे तिथे जास्त भाग भांडवल गुंतविण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कार्यालयीन बांधकाम क्षेत्रातली गुंतवणूक जास्त असल्याचे निरिक्षण नाईट फ्रँकचे चेअरमन शिरीष बैजल यांनी नोंदविले आहे. कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक फटका हा रिटेल व्यवसायाला बसला आहे. अनेक माँल बंद पडले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसते.

२०११ ते २०२० या कालावधीत झालेली गुंतवणूक (दशलक्ष डाँलर्स मध्ये)

शहर

भाग भांडवल

मुंबई

५०५१

दिल्ली

२८०३

हैद्राबाद

२०१०

बंगळूरू

१८३९

चेन्नई

१११८

पुणे

९३६

अन्य

६७

 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योग