Join us
Daily Top 2Weekly Top 5

छळाच्या निषेधार्थ तळोजा कारागृहामध्ये कैद्याचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 03:33 IST

रक्षकाकडून मारहाणीचा आरोप; कुटुंबीयांचाही आंदोलनाचा इशारा

मुंबई : खुनाच्या आरोपाखाली नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या जोरावर सिंह कौर याने तुरुंग अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून जेलमध्ये उपोषण सुरू केले आहे. त्याने अन्नत्याग केला असून त्याला भेटू दिले जात नसल्याचा आरोप त्याची बहीण विरेंदर कौर यांनी केला आहे. भावाच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी तुरुंग प्रशासन जबाबदार असेल, याच्या निषेधार्थ कारागृह महासंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.जोरावर सिंह हा गेल्या दीड वर्षापासून तळोजा कारागृहात आहे. त्याला पंजाबमधील एका गुन्ह्यात शिक्षा झाली आहे, तर खारघर येथे एका न्यायाधीशाच्या पत्नीचा सुपारी घेऊन खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वर्षभरापूर्वी त्याला कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली होती, त्यात तोंडावर जखमा, पायाला फ्रॅक्चर होऊनही जेल प्रशासनाने उपचाराकडे दुर्लक्ष केले होते. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर जेल व रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर ही बाब स्पष्ट झाल्यावर सहा तुरुंगाधिकाऱ्यांविरुद्ध जबर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. काहींना निलंबित करण्यात आलेले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये अधिकाºयांना फायद्याचे ठरण्यासाठी जोरावर सिंह याला पंजाब जेलमध्ये पाठविण्याची विनंती प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याला जोरावर व त्याच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने जेलमध्ये मारहाण व छळ करण्यात येत आहे. त्यामुळे तीन दिवस त्याने अन्नत्याग केला असून आपल्याला व वकिलाला भेटू दिले जात नाही, असा आरोप त्याची बहीण विरेंद्रर कौर यांनी केला.तळोजा जेलकडून उडवाउडवीची उत्तरेतळोजा कारागृहात दूरध्वनी करून घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता सुरक्षारक्षकाकडून टाळाटाळ करण्यात आली. जेल अधीक्षकांना फोन देण्यास सांगितले असता ते नाहीत, असा काही प्रकार घडलेला नाही, असे सांगत तेथील नियंत्रण कक्षातील रक्षकाने नाव न सांगता फोन कट केला.