तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 21, 2015 03:09 IST2015-02-21T03:09:30+5:302015-02-21T03:09:30+5:30
तळोजा कारागृहात रमेश वाटारे (४५) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली

तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या
नवी मुंबई : तळोजा कारागृहात रमेश वाटारे (४५) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. बलात्काराच्या गुन्ह्णाखाली अटक असलेल्या या व्यक्तीने मुलीच्या चिंतेत आत्महत्या केल्याचे समजते. कारागृहातील शौचालयात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.
बोरिवली येथे राहणाऱ्या रमेशवर एक वर्षापूर्वी केलेल्या बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. पत्नी, मुलगा व मुलगी कामाला गेल्यावर घरात एकटाच असताना त्याने हे कृत्य केलेले. या गुन्ह्णाप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तळोजा कारागृहात त्याला ठेवण्यात आलेले होते. गुरुवारी मध्यरात्री कारागृहाच्या शौचालयात त्याने चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघड झाल्याने खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. वाटारे याच्या आत्महत्येमागे कौटुंबिक चिंतेचे कारण असल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वीच वाटारे याच्या पत्नीचे तसेच मुलाचे निधन झाल्याने त्याची मुलगी एकटीच घरी राहत होती. काही दिवसांपूर्वी ती कारागृहामध्ये येऊन वाटारेला भेटून गेली. त्यामुळे एकाकी पडलेल्या स्वत:च्या मुलीची त्याला काळजी वाटू लागलेली. शिवाय जामीन मिळत नसल्यानेही तो चिंतीत होता. याच तणावात त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)