घरफोडी करणारा आरोपी अटकेत

By Admin | Updated: May 22, 2014 03:38 IST2014-05-22T03:38:29+5:302014-05-22T03:38:29+5:30

तालुक्यातील कोल्हीकोपर येथील एका बंद घरात घरफोडी करून पेटीतील ८० हजार रूपये रोख रक्कम लंपास करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे

Prisoner detained accused | घरफोडी करणारा आरोपी अटकेत

घरफोडी करणारा आरोपी अटकेत

पनवेल : तालुक्यातील कोल्हीकोपर येथील एका बंद घरात घरफोडी करून पेटीतील ८० हजार रूपये रोख रक्कम लंपास करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. कोल्हीकोपर येथे राहणार्‍या देवनुबाई श्रावण वाघे यांचे घर बंद असल्याचे पाहून त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घराच्या आत असलेल्या पत्र्याच्या पेटीमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रूपये रोख रक्कम त्याने लंपास केली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर त्याचप्रमाणे पोलीस हवालदार मनोज चौधरी, ज्ञानेश पाटील, महेश पाटील, माधव शेवाळे आदिंच्या पथकाने अधिक शोध घेतला असता आरोपी अरूण रामा फुलमाळे (३०,रा.कोल्हीकोपर) याने घरफोडी करून तो गावाला जाण्याच्या बेतात असल्याचे समजले. त्यानुसार या पथकाने पनवेल एसटी स्टँड परिसरात सापळा रचून त्याला पकडले. (वार्ताहर)

Web Title: Prisoner detained accused