बोरीवलीत हुक्का पार्लरवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 06:21 IST2018-10-21T06:21:17+5:302018-10-21T06:21:19+5:30

बोरीवलीत एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा टाकून दोन व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली.

Printed at Hukka Parlor in Borivli | बोरीवलीत हुक्का पार्लरवर छापा

बोरीवलीत हुक्का पार्लरवर छापा

मुंबई : बोरीवलीत एका हुक्का पार्लरवर शुक्रवारी छापा टाकून दोन व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखा, कक्ष १२ ने ही कारवाई केली.
बोरीवलीतील कुलूपवाडी परिसरात असलेल्या एन ९९ या रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये ७ हुक्का पाइप, ७ चिलीम, ७ हुक्क्याची भांडी, शेगडी, ग्राहकांचे बिलबुक तसेच ३,१४० रुपयांची रोकड जप्त केली. छाप्यात २ व्यवस्थापकांसह ६ ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या सर्वांचा ताबा कस्तुरबा पोलिसांकडे देण्यात आला आहे.

Web Title: Printed at Hukka Parlor in Borivli