13 मतदारसंघांमध्ये मिळणार मतदानाची छापील पावती
By Admin | Updated: September 28, 2014 02:09 IST2014-09-28T02:09:50+5:302014-09-28T02:09:50+5:30
मतदानाची छापील पावती (पेपर ट्रेल) त्यांना लगेच देण्याची सोय निवडणूक आयोगाने गेल्या निवडणुकीपासून निवडक ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.

13 मतदारसंघांमध्ये मिळणार मतदानाची छापील पावती
>मुंबई : मतदारांनी केलेल्या मतदानाची छापील पावती (पेपर ट्रेल) त्यांना लगेच देण्याची सोय निवडणूक आयोगाने गेल्या निवडणुकीपासून निवडक ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 13 मतदारसंघांमधील 3,943 मतदान केंद्रांवर अशी सोय उपलब्ध असेल.
त्यानुसार औरंगाबाद मध्य (1क्7), औरंगाबाद पश्चिम (1क्8), औरंगाबाद पूर्व (1क्9), अमरावती (38), अचलपूर (42), नाशिक पूर्व (123), नाशिक मध्य (124), नाशिक पश्चिम (125), वर्धा (47), भंडारा (61), चंद्रपूर (71), यवतमाळ (78), अहमदनगर शहर (225) या मतदारसंघांमध्ये मतदारांना मतदानाची छापील पावती मिळेल.