Join us  

पंतप्रधानांच्या मत्स्य संपदा योजनेचा कोळी समाजाला लाभ मिळावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 6:49 PM

Fisheries Wealth Scheme : नैसर्गिक आपत्तींमुळे कोळी समाज संकटात सापडला

मुंबई : मुंबईत 41 कोळीवाडे असून स्थानिक भूमिपूत्रांचा मासेमारी हे प्रमुख उपजीवीकेचे साधन आहे. उत्तर मुंबईत मढ,भाटी, मालवणी,मनोरी, गोराई हे पाच कोळीवाडे आहेत.

गेली दोन वर्षे अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे कोळी समाज संकटात सापडला आहे. त्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना साथीच्या लॉक डाऊनने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना तातडीने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळायला हवा अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त  अतुल पाटणेकर यांना एका पत्राद्वारे केली आहे. 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मत्स्य संपदा योजना व किसान क्रेडिट कार्ड वितरण योजना या मत्स्य उद्योगाच्या यशस्वी दिशेने सुरू केल्या होत्या.मात्र 

या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय खात्याने ठोस पावले उचलली नसल्याने उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील कोळी समाजाला यांचा अजिबात फायदा झाला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गेली दोन वर्षे अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे कोळी समाज संकटात सापडला आहे. त्यानंतर मार्च 2020 पासून कोरोना साथीच्या लॉकडाऊनने या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.अशा परिस्थितीत कोळी समाजाला तातडीने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

या विषयाचे गांभीर्य आणि समाजाची आर्थिक विवनचनेत अडकलेल्या कोळी समाजाला न्याय देण्यासाठी खासदार शेट्टी यांच्या बोरिवली पश्चिम लोकमान्य नगर येथील कार्यालयात उद्या मासेमारी करणारे कोळी बांधव व व्यावसायिकांची महत्वाची बैठक बोलावली आहे. मुंबई मत्स्य आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधींनीही या बैठकीला उपस्थित रहावे अशी  विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :मुंबईसरकारमहाराष्ट्र