नेरूळमधील संस्थेच्या कामाचा गौरव

By Admin | Updated: May 8, 2014 02:41 IST2014-05-07T23:02:43+5:302014-05-08T02:41:37+5:30

नेरूळमधील विश्वास नागरी सहकारी पतसंस्थेचा कराडमधील सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्थेने गौरव केला आहे.

Pride of Neral organization work | नेरूळमधील संस्थेच्या कामाचा गौरव

नेरूळमधील संस्थेच्या कामाचा गौरव

नवी मुंबई : नेरूळमधील विश्वास नागरी सहकारी पतसंस्थेचा कराडमधील सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्थेने गौरव केला आहे. सिक्किमचे राज्यपाल श्रीनीवास पाटील यांच्या हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले.
सहकार क्षेत्रात चांगले काम करणार्‍या संस्थांचा सहकार भारतीकडून गौरव करण्यात येतो. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विश्वास नागरी संस्थेने १४ वर्ष चांगले काम केल्याबद्दल संस्थेचा सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विश्वास शिंदे, रफीक इनामदार , जालींदर कांबळे, मच्छींद्र कांबळे, गुलाबराव ठोंबरे, संपत घनवट, विजय भोसले उपस्थित होते.

Web Title: Pride of Neral organization work