डम्पिंग ग्राउंडसाठी यापूर्वीचे प्रयत्न फेल

By Admin | Updated: November 27, 2014 01:17 IST2014-11-27T01:17:43+5:302014-11-27T01:17:43+5:30

पालिका वर्षभर सुटकेचा नि:श्वास सोडू शकेल़ मात्र मुंबईबाहेर कचरा टाकण्यासाठी जागा शोधण्याचे प्रयत्नही यापूर्वी अनेक वेळा फेल गेले आहेत़

Previous attempt failed for dumping ground | डम्पिंग ग्राउंडसाठी यापूर्वीचे प्रयत्न फेल

डम्पिंग ग्राउंडसाठी यापूर्वीचे प्रयत्न फेल

मुंबई : देवनार व मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास मुदतवाढ दिल्यामुळे पालिका वर्षभर सुटकेचा नि:श्वास सोडू शकेल़ मात्र मुंबईबाहेर कचरा टाकण्यासाठी जागा शोधण्याचे प्रयत्नही यापूर्वी अनेक वेळा फेल गेले आहेत़ त्यामुळे डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेची मदार आता राज्य सरकारवरच असणार आह़े
मुंबईत कच:याचा ढीग वाढत असताना डम्पिंग ग्राउंडची मर्यादा संपुष्टात आलेली आह़े डम्पिंग ग्राउंडसाठी राज्य सरकार पर्यायी जागा देऊ न शकल्यामुळे उच्च न्यायालयाने देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास सोमवारी वर्षभराची मुदतवाढ दिली़ या कालावधीत राज्य सरकार आणि पालिकेने डम्पिंग ग्राउंडसाठी जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत़
मात्र यापूर्वीही डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाबरोबर (एमएमआरडीए) पालिकेने केलेले पत्रव्यवहार केराच्या टोपलीत गेले आहेत़ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या प्राधिकरणाकडूनच थंड प्रतिसाद मिळाल्यामुळे या वेळी तरी जागा मिळेल का, याबाबत साशंकता असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े मुंबईत दररोज दहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो़ यापैकी चार हजार मेट्रिक टन देवनार व दीड हजार मेट्रिक टन मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो़ तर दोन हजार 
मेट्रिक टन कांजूरमार्ग डम्पिंग 
ग्राउंडवर टाकण्यात येत होता़ मात्र कांजूरमार्गचे प्रकरण न्यायालयात गेल़े त्यामुळे कांजूरमार्गचा पर्याय पालिकेला बंद झाला़ अडीच हजार मेट्रिक टन डेब्रिज व काही जैविक कचरा आह़े (प्रतिनिधी)
 
गाळ टाकण्यास जागा नाही
पावसाळ्यात नाल्यांतून काढण्यात आलेला गाळ कुठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता़ पर्यायी जागा देण्यासाठी त्या वेळी पालिकेने जिल्हाधिकारी, मुंबईच्या आसपासच्या शहरातील महापालिकांना विनंती केली होती़ मात्र आपल्या हद्दीत डम्पिंग ग्राउंडची जागा देण्यास कोणतीच महापालिका तयार झाली नाही़

 

Web Title: Previous attempt failed for dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.