Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘धुरंधर २’च्या प्रिव्ह्यू शोजचे ‘वाजले बारा’! प्रेक्षकांची मागणी - पैसे नको, चित्रपट दाखवा;  ऑनलाइन तिकिटांच्या कराचे पैसे कोण देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:44 IST

वितरण क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार २ के तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या सिनेमागृहांमध्ये हिंदीचे शो सुरळीत सुरू होते. ‘नॉन २ के’ चित्रपटगृहांमध्ये हिंदीचे शो दाखवताना समस्या येत आहेत.  

मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे प्रदर्शनापूर्वी बुधवारी या चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यू शोज आयोजित केले होते. पण, तांत्रिक कारणामुळे काही सिनेमागृहांमध्ये हे शो झाले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांची घोर निराशा झाली. चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनावर संतापलेल्या प्रेक्षकांनी ‘पैसे नको, चित्रपट दाखवा’, अशी मागणी केली. पण ती पूर्ण करण्यात व्यवस्थापनही अपयशी ठरले.बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११:४५ वाजेपर्यंत ‘धुरंधर २’चे प्रिव्ह्यू शोज दाखवले गेले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद लाभल्याने सर्व शोज हाऊसफुल झाले. मात्र प्रत्यक्षात काही सिनेमागृहांमध्ये शो रद्द झाल्याने प्रेक्षकांना चित्रपट न पाहताच घरी परतावे लागले. चेंबूरमधील फन सिनेमाजच्या के स्टार मॉलमधील सिनेमागृहात सायंकाळी ५ वाजता असलेला शो रद्द झाला. प्रेक्षकांनी व्यवस्थापनाकडे विचारणा करता सुरुवातीला ‘केडीएम’ आले नसल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला पुढल्या शोमध्ये सिनेमा पाहता येईल असे सांगण्यात आले, पण त्यानंतरचे ६ आणि ६:३० वाजताचे शोजही रद्द करण्यात आले. तसेच वांद्रे येथील गेईटी आणि गॅलेक्सी येथील शो रद्द करण्यात आले.तिकिटे खरेदी केलेल्या प्रेक्षकांना तत्काळ पैसे परत करण्यात आले, पण ऑनलाइन बुकिंग केलेल्यांना २४ तास प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांचे फोटो काढून घेतले व २४ तासांमध्ये पैसे परत येतील असे आश्वासन व्यवस्थापक अमित पाटील यांनी दिले. 

निर्मिती संस्थेची दिलगिरीया संदर्भात जिओ स्टुडिओज आणि बी ६२ स्टुडिओजने अधिकृत वक्तव्य प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी करत प्रेक्षकांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमा मागितली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मल्याळम आणि कन्नड भाषांमधील प्रिव्ह्यू शोज रात्री ९ वाजता सुरू होतील असे त्यात नमूद करण्यात आले. संपूर्ण भारतात हिंदी भाषेतील शोज व्यवस्थित सुरू असल्याचे त्यात म्हटले गेले, पण वास्तवात चित्र खूप वेगळे होते.

तंत्रज्ञानामुळे गोंधळ! वितरण क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार २ के तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या सिनेमागृहांमध्ये हिंदीचे शो सुरळीत सुरू होते. ‘नॉन २ के’ चित्रपटगृहांमध्ये हिंदीचे शो दाखवताना समस्या येत आहेत.  

कोट्यवधींची उलाढाल...‘धुरंधर २’ला प्रिव्ह्यू शोच्या रूपात जवळपास ३३ कोटी रुपयांची कमाई होऊ शकते असा अंदाज चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रिव्ह्यू शोसाठी कमीत कमी तिकीट ३५० रुपये, तर महागडे तिकीट ३१०० रुपये होते.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Preview Shows Fail; Angered Audience Demands Show!

Web Summary : Technical issues caused 'Dhurandhar 2' preview show cancellations, frustrating audiences. Despite refunds, viewers demanded the film. Jio Studios apologized for disruptions to screenings.
टॅग्स :मुंबई