Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक कालवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 23:53 IST

ज्येष्ठ कामगार नेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबई - ज्येष्ठ कामगार नेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मुंबईतील झेन रुग्णालयात त्यांनी सोमवारी रात्री ८.३० वाजता अखेरचा श्वास घेतला.सूर्यकांत महाडिक हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्षपद भूषवत होते. तसेच त्यांनी दोन वेळा आमदार म्हणूनही काम केले होते. त्याबरोबरच रिझर्व्ह बँक युनियन फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून ते काम पाहत होते.सूर्यकांत महाडिक यांचे पार्थिव त्यांच्या चेंबूरमधील बोर्ला-घाटलागाव येथील अमर निवास, महादेव पाटील वाडी येथील निवासस्थानी सकाळी सात ते १० यावेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तसेच त्यांच्या पार्थिवावर रत्नागिरीमधील काडवली या मूळगावी अंत्यसंस्कार होतील.

 

टॅग्स :मुंबई