मागाठाणेत दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Published: September 7, 2023 03:46 PM2023-09-07T15:46:12+5:302023-09-07T15:47:31+5:30

विविध राजकीय नेत्यांबरोबरच अनेक मराठी व सिने क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी लाभली.

presence of political leaders along with many actors in dahi handi festival in magathane | मागाठाणेत दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती

मागाठाणेत दहीहंडी उत्सवात अनेक कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई -पश्चिम उपनगरातील सर्वात मोठी आणि मानाची दहीहंडी म्हणून मागाठाणे दहीकाला महोत्सव म्हणून ओळखला जातो.तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे आयोजित हा दहीकाला महोत्सव बोरिवली ( पूर्व)
देवीपाडा मेट्रो स्थानका समोर देवीपाडा मैदानात आयोजित केला होता. येथील दहीहंडी निमित्ताने विविध राजकीय नेत्यांबरोबरच अनेक मराठी व सिने क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी लाभली.

दुपारी 12 वाजता येथील दहीहंडी उत्सवाला पावसात जल्लोषात सुरवात झाली. दुपारनंतर खऱ्या अर्थाने दहीहंडी उत्सवाला रंग चढला. अनेक गोविदा पथकांनी पावसात  डीजेच्या तालावर थिरकत  5,6,7,8 थर लावले होते. त्यांना रोख पारितोषिक देवून गौरावण्यात आले.यामध्ये महिला व बाल गीविंदा पथकांनी सुद्धा थर लावून सलामी दिली.

दुपारी 3 पर्यंत भाजपा नेत्या चित्रा वाघ, शिवसेना उपनेत्या-प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या सह प्रसिद्ध लावणी फेम गौतमी पाटील,प्रसिद्ध निर्माते महेश कोठारी,अभिनेत्री आयशा पटेल,अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,अभिनेत्री रुपाली भोसले यांनी येथे आवर्जून उपस्थिती लावली.

येथील गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राची प्रसिद्ध लावणी फेम गौतमी पाटील यांच्या लावणीने तर गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

 मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते महेश कोठारे यांनी या दहीहंडी उपस्थित राहून आमदार प्रकाश सुर्वे याना शुभेच्छा दिल्या आणि गोविंदा पथकांचे मनोधैर्य वाढवले.आमच्या दोघांची दोस्ती तुटायची नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: presence of political leaders along with many actors in dahi handi festival in magathane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.