लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सायनच्या प्रतीक्षानगरमधील ८८ इमारती, ट्रांजिस्टर कॅम्पमध्ये ६,२०० भाडेकरू राहतात. अनेक इमारतींना ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्याने त्या धोकादायक झाल्या आहेत. काळाचौकी, अभ्युदय नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर प्रतीक्षा नगरचाही प्रस्ताव तयार करा, चांगल्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशी घरे देता येतील याचाही आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा उपाध्यक्षांना दिले.
मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून प्रतीक्षा नगर येथे राज्यातील सर्वात मोठे सहकार भवन उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रोळी येथील सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केले.
सहकाराने ग्रामीण भागात शेती, शेतीपूरक उद्योग क्षेत्रात उत्तम काम केले आहे. पण, सहकारातील गृहनिर्माणाचे क्षेत्र दुर्लक्षित होते. दरेकर यांनी गृहनिर्माण संस्थांच्या गरजा ओळखून त्यात बदल केला. सहकार कायद्यात संस्थांचा वेगळा भाग समाविष्ट करून आवश्यक त्या तरतुदी केल्या. त्यानंतर कार्यालयांचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला. यामुळे संस्थांना दिलासा मिळाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
देशात सर्वात जास्त
महाराष्ट्रात सहकारी संस्था असून यात मोठा वाटा गृहनिर्माण संस्थांचा आहे. मुंबई महानगर परिसर, पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांत त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर आहे.
'रेकॉर्ड टाइममध्ये वास्तू उभारा; उद्घाटनाला आम्ही येऊ'
आ. प्रवीण दरेकर यांनी मुंबईत सहकार भवन असावे ही संकल्पना मांडून पाठपुरावा केला आहे. त्यांनी शोधलेली जमीन शासनाच्या माध्यमातून मुंबई बँकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. म्हाडाच्या माध्यमातून येथे उभ्या राहणाऱ्या सहकार भवनात सहकार क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी प्राप्त होणार आहेत. ही वास्तू रेकॉर्ड टाइममध्ये पूर्ण करण्यात यावी. त्याच्या उद्घाटनालाही आम्ही येऊ, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
१३८ कार पार्किंगची व्यवस्था
तळमजला ते १ दहा मजली अशा सहकार भवनात १३८ कार पार्किंगची व्यवस्था, व्हीआयपी लॉबी असेल.
पहिले चार 3 मजले प्रशस्त ऑडिटोरियम, पाच व सहावा मजला मिनी ऑडिटोरियम असेल.
प्रशिक्षण वर्ग, ३ कॅन्टीन, सहकारी संघासाठी कार्यालय, मीडिया सेंटर, वाचनालय, लिफ्ट, अग्निसुरक्षा यंत्रणा अशा सुविधाही सहकार भवनात असणार आहेत.
Web Summary : Chief Minister directed MHADA to prepare a redevelopment plan for Pratiksha Nagar, home to 6,200 tenants in dilapidated buildings. A cooperative building is also planned with modern amenities, including parking and auditoriums.
Web Summary : मुख्यमंत्री ने म्हाडा को प्रतीक्षानगर के पुनर्विकास की योजना बनाने का निर्देश दिया, जहाँ जर्जर इमारतों में 6,200 किरायेदार रहते हैं। पार्किंग और ऑडिटोरियम सहित आधुनिक सुविधाओं के साथ एक सहकारी भवन की भी योजना है।