अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रेमनाथ सालियन
By Admin | Updated: March 11, 2017 03:02 IST2017-03-11T03:02:03+5:302017-03-11T03:02:03+5:30
अभ्युदय को-आॅपरेटीव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रेमनाथ सालियान यांची नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे मावळते व्यवस्थापकीय संचालक पुनीतकुमार शेट्टी

अभ्युदय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रेमनाथ सालियन
मुंबई : अभ्युदय को-आॅपरेटीव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रेमनाथ सालियान यांची नेमणूक करण्यात आली आहे. बँकेचे मावळते व्यवस्थापकीय संचालक पुनीतकुमार शेट्टी यांच्याकडून ४ मार्चपासून सालियान यांनी कार्याचा पदभार स्वीकारला. सालियान यांना बँकिंग क्षेत्राचा ३६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, अभ्युदय बँकेत रुजू झाल्यापासून त्यांनी विविध पदांवर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ते क्रेडिट अॅण्ड अॅडव्हान्सेस या क्षेत्रातील विशेष जाणकार आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)