ठाण्यात टीडीआरसाठी प्रीमियम
By Admin | Updated: August 2, 2015 03:51 IST2015-08-02T03:51:51+5:302015-08-02T03:51:51+5:30
हस्तांतरणीय विकास हक्काचा (टीडीआर) वापर करायचा असेल तर काही भागाच्या खरेदीवर प्रीमियम आकारण्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरासाठी दिला आहे.

ठाण्यात टीडीआरसाठी प्रीमियम
- यदु जोशी, मुंबई
हस्तांतरणीय विकास हक्काचा (टीडीआर) वापर करायचा असेल तर काही भागाच्या खरेदीवर प्रीमियम आकारण्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहरासाठी दिला आहे. त्यामुळे टीडीआरचे दर नियंत्रणात राहतील आणि महापालिकेला मोठा आर्थिक फायदा होईल. माफियांना चाप बसेल. नागरिकांना प्रीमियम भरून अतिरिक्त एफएसआय मिळविण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्यातील इतर महापालिकांसाठीही हा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे.
टीडीआर लॉबीकडे जाण्याची गरज नाही
९ ते १२ मीटरपर्यंतच्या रस्त्यालगत असलेल्या जमिनींसाठी मूळ एक एफएसआयव्यतिरिक्त ०.६० इतका टीडीआर दिला जातो. त्यापैकी ०.४० टक्के टीडीआर घेतल्यानंतर आणि उर्वरित ०.२० टक्क्यासाठी महापालिकेकडे प्रीमियमची रक्कम भरून तो घ्यावा लागेल. तो रेडिरेकनरच्या दराने खरेदी करता येईल.
याशिवाय १२ मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांलगत असलेल्या जमिनीसाठी मूळ एक एफएसआयव्यतिरिक्त ०.८० इतका टीडीआर मिळतो. आता त्याचे विभाजन करून ०.५० टीडीआर मिळेल; पण उर्वरित ०.३० टीडीआरसाठी रेडिरेकनसाठी प्रीमियम महापालिकेकडे भरावा लागेल.
तसेच अनुक्रमे ०.२० टक्के आणि ०.३० टक्क्यापर्यंतचा टीडीआर खरेदी करण्यासाठी नागरिकांना टीडीआर लॉबीकडे जाण्याची गरज राहणार नाही. तो महापालिकेत प्रीमियम भरून खरेदी करता येईल.