प्रेम बसंतानी महासंघाच्या अध्यक्षपदी
By Admin | Updated: June 26, 2017 02:36 IST2017-06-26T02:36:03+5:302017-06-26T02:36:03+5:30
नगरपरिषद महासंघाचे अध्यक्ष म्हणून, हिंगणघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांची नुकतीच नगरपरिषद महासंघाच्या सभेत एकमताने निवड झाली.

प्रेम बसंतानी महासंघाच्या अध्यक्षपदी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपरिषद महासंघाचे अध्यक्ष म्हणून, हिंगणघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांची नुकतीच नगरपरिषद महासंघाच्या सभेत एकमताने निवड झाली. अंधेरी(प) जुहू लेन येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यातील नगराध्यक्षांची परिषद नुकतीच संपन्न झाली.
राज्यातील ३२९ नगराध्यक्षांच्या विविध समस्यांबाबत ऊहापोह करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल, असे महासंघाचे अध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी सांगितले. महासंघाचे मावळते अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांची नगरपरिषद महासंघाचे सहअध्यक्ष, तर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांची नगरपरिषद महासंघाचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली.