गर्भवतींना हवी ३८ मिली ग्रॅम लोहाची गरज!
By Admin | Updated: March 7, 2015 22:31 IST2015-03-07T22:31:53+5:302015-03-07T22:31:53+5:30
गर्भवतींना लोहाची जास्त गरज असते. बाळ पोटात असताना त्याच्या शरीरात लोह साठवते, त्यातून जन्मल्यानंतर सुमारे सहा महिने लागणाऱ्या लोहाची गरज भागवली जाते.

गर्भवतींना हवी ३८ मिली ग्रॅम लोहाची गरज!
सुरेश लोखंडे - ठाणे
गर्भवतींना लोहाची जास्त गरज असते. बाळ पोटात असताना त्याच्या शरीरात लोह साठवते, त्यातून जन्मल्यानंतर सुमारे सहा महिने लागणाऱ्या लोहाची गरज भागवली जाते. ही गरज पूर्ण करण्याकरीता गर्भवतीसाठीसाठी ३८ मिली ग्रॅम एवढ्या लोहची गरज असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी दिली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा रूग्णालयाने महिला आरोग्य अभियान सुरू केले आहे. त्याद्वारे महिलाचा आहार, आजार त्यावरील उपचार यांची माहिती डॉ. राठोड यांच्यासह आहार तज्ज्ञ शितल नागरे यांनी दिली. गर्भवतींना २८ ते ३२ आठवड्यांच्या कालावधीत लोहाची गरज मोठ्या प्रमाणात लागते. लोहामुळे नवीन व शुध्द रक्त, जास्तीत जास्त आॅक्सीजन आणि पोषक तत्वं बाळाला पुरवण्यात व त्याची योग्य वाढ होण्यास मदत होते. यासाठी सकस व योग्य आहार घेणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने अंडी, किसमीस, अळीव, हिरव्या पालेभाज्या, भाजलेले कडधान्यांचा समावेश आहे.
४स्वच्छतेचा अभाव, पुरेसा आहार न घेणे,
४दीर्घकाळ कुपोषण असेल तर
४शाकाहारी आहार घेत असल्यास
४जंत असल्यामुळे
४दीर्घकाळ आजार
४अन्न पदार्थाबाबत गैर समज
४एक वर्षाच्या आत दुसरी गर्भधारणा
४प्रसुतीच्या वेळी झालेला
रक्तस्राव
४जास्त वेळेस गर्भधारणा