Join us  

आधी टीकेचे प्रहार, आता स्तुतीचा उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:18 AM

गेल्या लोकसभा निवडणुकीत वा नंतरच्या साडेचार वर्षांत एकमेकांवर सडकून टीका करणारे नेते यावेळी एकमेकांची प्रशंसा करताना दिसत आहेत.

- यदु जोशी मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत वा नंतरच्या साडेचार वर्षांत एकमेकांवर सडकून टीका करणारे नेते यावेळी एकमेकांची प्रशंसा करताना दिसत आहेत. युतीचा धर्म म्हणून त्यांना तसे करावे लागत आहे. तर काहींनी पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर अशी पाळी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांची आणि एकमेकांच्या पक्षांची प्रशंसाच केली पण नंतरच्या साडेचार वर्षांत दोघांचे पक्ष केंद्र व राज्यात सोबत सत्तेत असूनही दोघांनी एकमेकांवर कटू टीका केली. विशेषत: उद्धव यांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना अनेकदा अक्षरश: ठोकून काढले. यावेळी मोदी हे आपले भाऊ असल्याचे ठाकरे सांगत आहेत. ‘आम्ही मनाने एकच आहोत’ अशी साक्ष मुख्यमंत्री देत आहेत. २०१४ मध्ये भाजपा-शिवसेनेची लोकसभेला युती होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांबद्दल छानछान बोलत होते. त्यानंतर सहा महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघे एकमेकांवर तुटून पडले. गेल्या साडेचार वर्षांत मुंबई महापालिकेसह झालेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना वेगवेगळे लढले आणि जबड्यात हात घालण्यापासून एकमेकांचा पगार काढण्यापर्यंतची टीका केली गेली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गळ्यात गळा घालून एकमेकांची तारीफ करीत आहेत. काय म्हणाले होते उद्धव ठाकरेयुतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली.चौकीदार चोर आहे, असे लोकच म्हणतात.शिवसेना को पटकनेवाला पैदा नही हुआशिवसेना आता एकटीच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही.भाजपची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून त्यांनी अहमदनगरमध्ये सिद्ध केले आहे.काय म्हणाले होते मुख्यमंत्रीवाघाच्या जबड्यात हात घालुनी हात, मोजिते दात जात ही आमुची’आम्ही वाघाच्या गुहेतघुसून त्याचे दात मोजू शकतो.त्यांच्या भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपविण्याची जंग आम्ही छेडली आहे.खा.राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणूक हातकणंगेलमधून लढले आणि जिंकले. त्यावेळच्या भाषणांमधून नरेंद्र मोदी आणि भाजपाची स्तुती ते करीत होते. यावेळी भाजपापासून फारकत घेत ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढत आहेत. मोदी आणि भाजपा हे टीकेचे मुख्य लक्ष्य असतील.नारायण राणे २०१४ च्या निवडणुकीतमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश लोकसभेचे उमेदवार होते आणि राणे यांनी भाजपा-शिवसेना युतीवर टीकेची एकही संधी सोडली नव्हती. यावेळी ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले नाहीत तर आघाडी आणि युती अशा दोघांविरुद्धही तुटून पडतील. आघाडीची साथ मुलासाठी घेतली तर युतीला टीकेचे लक्ष्य करतील.श्रीनिवास वनगापालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. वडिलांपासून घरात भाजपाच होती पण पोटनिवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपावर टीकास्र सोडले. यावेळी ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून मतदारांसमोर जातील आणि भाजपावर स्तुतीसुमने उधळताना दिसतील.रणजितसिंह मोहिते-पाटील : राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आणि माजी राज्यसभा सदस्य रणजितसिंह मोहिते भाजपाच्या वाटेवर आहेत. आज-उद्या त्यांचा भाजपाप्रवेश निश्चित मानला जात आहे. २०१४ साली विजयदादांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली देखील. त्यावेळी रणजितसिंह यांनीच प्रचाराची सुत्रे सांभाळली होती. अनेक सभांमधून त्यांनी भाजपा-शिवसेनेवर टिकेचे प्रहार केले होते. मात्र, यावेळी ते भाजपाचा प्रचार करताना काँग्रेस-राष्टÑवादीवर टीका करताना दिसले, तर कोणाला आश्चर्य वाटायला नको!डॉ. सुजय विखे पाटीलगतकाळात डॉ. सुजय विखे यांनी भाजपा व नरेंद्र मोदींवर सडकून टीका करणारी भाषणे जागोजागी दिली. अनेकदा जिव्हारी लागतील असे शब्द वापरले. तेच सुजय आता भाजपात गेले असून अहमदनगरमधून पक्षाचे उमेदवार असतील. त्यामुळे भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना दिसतील.नाना पटोले२०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर नाना पटोले हे भाजपाकडून लोकसभेवर गेले होते.डिसेंबर २०१७ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि काहीच दिवसांत ते काँग्रेसमध्ये गेले. यावेळी ते नागपुरात काँग्रेसचे उमेदवार असून भाजपावर टीकेची एकही संधी सोडणार नाहीत.

टॅग्स :लोकसभा निवडणूकभाजपाशिवसेना