वृंदा करात यांच्या राज्यात प्रचारसभा
By Admin | Updated: October 7, 2014 01:31 IST2014-10-07T01:31:46+5:302014-10-07T01:31:46+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने रान माजविले असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यादेखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

वृंदा करात यांच्या राज्यात प्रचारसभा
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने रान माजविले असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यादेखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.
विधानसभेच्या रणधुमाळीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा सुरू केला आहे. विशेषत: नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या सभा आणि भाषणांनी महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नंदूरबार, नाशिक, ठाणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात उमेदवार उभे केले असून, या पक्षाचे २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी नंदूरबार येथे करात यांची जाहीर सभा होणार आहे. ८ आॅक्टोबरला नाशिकमधील कळवण व नाशिक पश्चिम येथे जाहीर सभा होणार आहे. ९ व १० आॅक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यातील विक्रमगड, पालघर, डहाणू येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. ११ आॅक्टोबर रोजी सोलापूर मध्य या मतदारसंघात व १२ आॅक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघात वृंदा करात यांच्या जाहीर सभा होणार आहेत, अशी माहिती पक्षाचे राज्याचे सचिव अशोक ढवळे यांनी दिली. (प्रतिनिधी)