पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीची पालिका आणि रेल्वेकडून पाहणी दौरा

By जयंत होवाळ | Published: April 13, 2024 06:45 PM2024-04-13T18:45:03+5:302024-04-13T18:45:24+5:30

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातून काढलेला गाळ तसेच राडारोडा उचलणे, यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी यंत्रणांना देण्यात आल्या.

Pre-monsoon preparation inspection tour by Municipality and Railways at Western and Central Railway Stations | पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीची पालिका आणि रेल्वेकडून पाहणी दौरा

पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीची पालिका आणि रेल्वेकडून पाहणी दौरा

मुंबई : पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या परिमंडळ १ अंतर्गत येणारी मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानके तसेच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची शनिवारी पाहणी करण्यात आली.रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यातील संभाव्य आव्हानांवर पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या दौर्याचे आयोजन करण्यात आले होते.

उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातून काढलेला गाळ तसेच राडारोडा उचलणे, यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी यंत्रणांना देण्यात आल्या.

आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, चर्नी रोड व ग्रँट रोड तसेच मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने हसनाळे यांनी रेल्वे स्थानकांची पाहणी केली.'बी' विभागातील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक येथील पाहणी दरम्यान 'बी' विभागाचे सहायक आयुक्त उद्वव चंदनशिवे, सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक विनायक शेवाळे उपस्थित होते.

सँडहर्स्ट रोड रेल्वे रुळालगत असलेल्या इमारतीची पाहणी करुन पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना कराव्यात तसेच रेल्वे अंतर्गत असलेल्या ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा उचलण्यात यावा, नियमितपणे नाले स्वच्छता करावी, असे निर्देश हसनाळे यांनी दिले. त्यानंतर, 'बी' विभाग आपत्कालीन नियंत्रण कक्षास प्रत्यक्ष भेट देऊन यंत्रणेचा देखील त्यांनी आढावा घेतला. हॉट लाईनवरून मुख्य कार्यालयाशी स्वतः संपर्क करून यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित असल्याची खात्री केली.

Web Title: Pre-monsoon preparation inspection tour by Municipality and Railways at Western and Central Railway Stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.