प्रशांत ठाकूर जनहितासाठी भाजपात

By Admin | Updated: October 10, 2014 02:21 IST2014-10-10T02:21:53+5:302014-10-10T02:21:53+5:30

स्थानिकांनी टोलमाफी मिळावी याकरीता प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांची मागणी रास्त असून पनवेलकरांना टोल माफ झाला पाहिजे

Prashant Thakur for the masses | प्रशांत ठाकूर जनहितासाठी भाजपात

प्रशांत ठाकूर जनहितासाठी भाजपात

पनवेल : स्थानिकांनी टोलमाफी मिळावी याकरीता प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यांची मागणी रास्त असून पनवेलकरांना टोल माफ झाला पाहिजे. ठाकूर यांनी स्वार्थासाठी नाही तर जनहितासाठी भाजपात प्रवेश केला असल्याची पावती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ स्वराज यांनी गुरुवारी खारघर येथील गुडविल बिल्डींगसमोरील मैदानात सभा घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. जनहिताकरीता सद्याची लढाई असून सत्ताधारी पक्षात राहून लोकांच्या प्रश्नासाठी लढणारे प्रशांत ठाकूर यांचे स्वराज यांनी कौतुक केले. याच कारणामुळे प्रशांत यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार असून तसे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत स्वराज यांनी दिडशे जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. शरद पवार यांच्यावर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या, पवार देशाचे कृषी मंत्री असतानाही महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.
मध्यप्रदेशाला कृषीक्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी केले म्हणून पदक मिळाले. या उलट महाराष्ट्राचा विकास दर खाली घसरला. गेल्या पाच वर्षात राज्यातही एकही उद्योग आला नाही, यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाराष्ट्राचा विनाश करायचा जणू काही विडाच उचलला आहे की काय अशी शंका निर्माण होत असल्याचा आरोप स्वराज यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता द्या या महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे पसरवू त्याचबरोबर खेडोपाडी चोवीस तास वीज असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रशांत ठाकूर यांची प्रशंसा करताना त्या म्हणाल्या,ठाकूर यांनी जनहितासाठी इतके मोठे आंदोलन उभे केले. अशा उमेदवाराला संधी देण्याकरीता त्याचबरोबर पनवेलकरांनी आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी कमळाच्या चिन्हा पुढील बटन दाबावे व भाजपाला प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. पक्ष किती मोठा आहे हे महत्वाचे नाही तर जनता बरोबर असणे गरजेचे असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
प्रशांत ठाकूर ३६५ दिवस जनतेची सेवा करणारा आमदार आहे. पनवेल शहर आणि सिडको वसाहतीत अनेक कामे बाकी असून आगामी काळात ते पूर्ण करू असा विश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. आपला हक्काचा माणुस म्हणुन मला संधी द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खासदार हरबनसिंग, रविंद्र कुशवाह उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Prashant Thakur for the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.