ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: April 7, 2024 17:43 IST2024-04-07T17:42:50+5:302024-04-07T17:43:46+5:30
ही निवडणूक २०२४ - २०२६ या सालासाठी होती. काल झालेल्या या निवडणूकीत वकील संघटनेच्या १४६७ सभासदांपैकी १३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम पुन्हा विजयी
ठाणे : ठाणे जिल्हा वकील संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली. यात ॲड. प्रशांत कदम हे पुन्हा एकदा विजयी झाले असून त्यांना तिसऱ्यांदा या वकील संघटनेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. त्यांना ८५९ मते मिळाली.
ही निवडणूक २०२४ - २०२६ या सालासाठी होती. काल झालेल्या या निवडणूकीत वकील संघटनेच्या १४६७ सभासदांपैकी १३७९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा ९४ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. मुनीर अहमद यांनी काम पाहिले. उपाध्यक्ष म्हणून ॲड. सलील बुटाला, सचिव म्हणून जगदीश शिंगाडे, खजिनदार म्हणून रेखा हिवराळे, सहसचिव (पुरूष) म्हणून भरत सोनावणे तर सहसचिव (महिला) कविता चौधरी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य म्हणून शैलेश कदम, सोपान चव्हाण, कृष्णांत काटकर, पुनम कामतकर, पूजा कासले आदीं या निवडणूकीत विजयी झाले.