Join us  

“संकुचित वृत्तीने ‘आय आय’ करुन आपण इल होतो, ‘वुई वुई’ने वेल होतो”: प्रल्हाद पै

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 8:24 PM

लोकमत आणि जीवनविद्या मिशन यांचे एकमत झाले, तर जगाला फायदा होईल, असे सद्गुरू वामनराव पै म्हणाले होते, अशी आठवण प्रल्हाद पै यांनी सांगितली.

मुंबई: लोकमत आणि जीवनविद्या मिशन ही युती स्ट्राँग होत गेली. लोकमत आणि जीवनविद्या मिशन यांचे एकमत झाले, तर जगाला फायदा होईल, असे सद्गुरू वामनराव पै म्हणाले होते. संकुचित वृत्तीने ‘आय आय’ करुन आपण इल होतो, ‘वुई वुई’ने वेल होतो, असे सांगत प्रल्हाद पै (Pralhad Wamanrao Pai) यांनी सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे सोपान अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितले. लोकमत मुंबई आवृत्तीने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.  

ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी, स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी मुंबईत लोकमत सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते. लोकमतच्या मुंबई आवृत्तीने पंचविसाव्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने महामुंबईचा पंचवीस वर्षांचा आढावा घेणारा ‘पंचवीस वर्षांची मुंबई’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार, जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली, तर लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी प्रल्हाद वामनराव पै यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

सर्वांमुळे मी आहे, हे तत्त्वज्ञान रुजवणे गरजेचे आहे

राजकीय पुढाऱ्यांनी आपापली भाषणे केली. मी सर्वपक्षीय आहे. कारण सर्व पक्षांनी जीवनविद्या मिशनचे कार्य जाणलेले आहे. सर्व पक्ष आम्हाला कायम सर्व बाबतीत मदत करत असतात, असे सांगत, माझा विषय राजकीय नाही. परंतु, एकटा माणूस, एकटा पक्ष किंवा एकटा नेता काही करू शकत नाही. कार्यकर्ते, समाज यांच्यामुळेच तो पुढे जात असतो. सर्वांमुळे मी आहे, हे तत्त्वज्ञान रुजवणे गरजेचे आहे, असे प्रल्हाद पै यांनी नमूद केले. 

लोकमत आणि जीवनविद्या मिशन ही युती स्ट्राँग होत गेली

लोकमत आणि जीवनविद्या मिशन ही युती स्ट्राँग होत गेली. लोकमत आणि जीवनविद्या मिशन यांचं एकमत झालं तर जगाला फायदा होईल, असे सद्गुरू वामनराव पै म्हणाले होते. माणसाच्या मनांचे पूल जोडायचे काम जीवनविद्या मिशन कायम करत आहे. सुसंस्कृत समाज घडवणं हे आमचे काम आहे. संस्कृत समाज निर्माण करायचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वांनी हा विचार केला, तर लवकरच भारत महासत्ता म्हणून उदयाला येईल, असा विश्वास प्रल्हाद पै यांनी व्यक्त केला. 

‘आय आय’ करुन आपण इल होतो, ‘वुई वुई’ने वेल होतो

संकुचित वृत्तीमुळे आपण मी आणि माझे याच्यापुढे जात नाही. राजकीय क्षेत्रात किंवा समाजकारणात केवळ ‘आय आय’ करुन आपण इल होतो, ‘वुई वुई’ने वेल होतो. स्वतःचा विचार करा, परंतु, स्वतःचा विचार करताना इतरांचा विचार करायलाही शिका. जी पिढी सर्वांचा विचार करते, ती फक्त त्याग करायला सांगत नाही. तर, तू सुखी हो, मग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर, अशी शिकवण देते, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.  

टॅग्स :प्रल्हाद पैलोकमत इव्हेंटमुंबई