प्रज्वलचे शानदार विजेतेपद
By Admin | Updated: January 10, 2017 04:06 IST2017-01-10T04:06:16+5:302017-01-10T04:06:16+5:30
अव्वल मानांकित प्रज्वल तिवारी याने एकतर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळ करताना १२ वर्षांखालील अखिल भारतीय मानांकन

प्रज्वलचे शानदार विजेतेपद
मुंबई : अव्वल मानांकित प्रज्वल तिवारी याने एकतर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळ करताना १२ वर्षांखालील अखिल भारतीय मानांकन अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, मुलींच्या गटात तिसरे मानांकन असलेल्या अन्या जेकबने अनपेक्षित विजेतेपद जिंकताना द्वितीय मानांकित अस्मी वाधवाला नमवले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) मान्यतेने वोडहाऊस जिमखान्याच्या वतीने झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या अंतिम सामन्यात प्रज्वलने सातव्या मानांकित आर्यन काळेचा ६-१, ६-० असा फडशा पाडला. दुसरीकडे, मुलींच्या अंतिम सामन्यात अन्याने अस्मीचा ६-२, ६-० असा धुव्वा उडवत बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)