प्रदीपचा खून अनैतिक संबंधातून
By Admin | Updated: October 27, 2014 00:37 IST2014-10-27T00:37:45+5:302014-10-27T00:37:45+5:30
त्यानंतर पतीनेच हा मृतदेह येथे गाडल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

प्रदीपचा खून अनैतिक संबंधातून
भिवंडी : तालुक्यातील वडपे गंगारामपाडा येथे गळा दाबून प्रदीप बामरे याची करण्यात आलेला खून हा नरबळी नसून प्रदीपच्या पित्याशी आरोपीच्या पत्नीचे असलेल्या अनैतिक संबंधाचा सूड उगविण्यासाठी झाला असल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला असून दरम्यान प्रदीपची हत्या आपल्याच पतीने केल्याची कबूली सोनी प्रकाश वैद्य हिने दिली आहे. त्यानंतर पतीनेच हा मृतदेह येथे गाडल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. मात्र, हा सारा प्रकार पोलिसांपासून लपवून ठेवत आरोपी पतीस फरार होण्यास मदत केल्या प्रकरणी सोनीला भिवंडी कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील खांडपा-चिंचवली येथील विश्वास बामरे याचे आरोपीच्या पत्नीशी अनैतीक संबध होते. याचा सूड घेण्याच्या उद्देशाने विश्वास बामरेचा मुलगा प्रदिप (१५) याची हत्या रोहित उर्फ प्रकाश उर्फ योगेश मधुकर वैद्य याने केल्याचे उघड झाले आहे. मात्र, हा मृतदेह गाडल्याने नरबळीचा प्रकार असल्याचा गावकऱ्यांचा आरोप होता.
शवविच्छेदन केले असता, प्रदीपला बिअर अथवा गुंगीचे औषध पाजून त्याचा गळा प्लास्टीकच्या दोरीने आवळल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोपीच्या पत्नीने पोलीसांना माहिती न देता गुन्हेगारास अप्रत्यक्ष मदत केल्याचा आरोप ठेऊन न्यायालयाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. या परिस्थितीमुळे बाप फरार व आई पोलीस कोठडीत अशा स्थितीत असलेल्या दीड वर्षाच्या साईनाथ याचे हाल होत आहेत. फरार आरोपी रोहित वैद्य याचा तपास पोलीस करीत असून त्यास अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीसांनी दिली. (प्रतिनिधी)