प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:30 IST2017-08-17T05:30:52+5:302017-08-17T05:30:55+5:30

वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस खात्यात गुरुवारी रुजू झाले. पोलीस महासंचालक कार्यालयात नियंत्रण कक्षात त्यांची नियुक्ती करण्यात आली

Pradeep Sharma again in the service | प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत रुजू

प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत रुजू

मुंबई : वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस खात्यात गुरुवारी रुजू झाले. पोलीस महासंचालक कार्यालयात नियंत्रण कक्षात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लखन भय्या बनावट चकमक प्रकरणातून निर्दोष मुक्ततता झाल्याने त्यांच्या पुन्हा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू असल्याचे आधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या सेवानिवृत्तीला काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सन्मानाने निवृत्त होण्यासाठी ते खात्यात रूजू झाले असल्याचे सांगण्यात आले.
१९८३ च्या बॅचचे उपनिरीक्षक असलेले शर्मा हे मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २००० च्या दशकात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नावाजले होते. गुन्हेगारी टोळ्यांशी त्यांचे संबंध असल्याचे आरोप झाले. लखन भय्या प्रकरणांत त्यांचासह १२ पोलिसांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.

Web Title: Pradeep Sharma again in the service