सराव करणारे वकील तसेच लिपिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST2020-12-04T04:19:49+5:302020-12-04T04:19:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालयाने सराव करणाऱ्या वकिलांना व वकिलांच्या नोंदणीकृत लिपिकांना लोकलने प्रवास ...

सराव करणारे वकील तसेच लिपिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारच्या विनंतीनुसार, रेल्वे मंत्रालयाने सराव करणाऱ्या वकिलांना व वकिलांच्या नोंदणीकृत लिपिकांना लोकलने प्रवास करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. २६ ऑक्टोबर रोजी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ही परवानगी देण्यात आली.
बुधवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार सराव करणाऱ्या वकिलांना व वकिलांच्या नोंदणीकृत लिपिकांना यापूर्वी २३ नाेव्हेंबरपर्यंत लाेकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली हाेती. आता न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे प्रवासासाठीच्या परवानगीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली. रेल्वेतून प्रवास करताना शासनाने जारी केलेले नियम व अटी पाळण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
...............................