बहिष्काराची प्रथा समूळ नष्ट व्हावी

By Admin | Updated: December 25, 2014 22:22 IST2014-12-25T22:22:48+5:302014-12-25T22:22:48+5:30

गेल्या वर्षभर जिल्ह्यात सामाजिक बहिष्कारासारखे वाईट प्रकार घडत आहेत. अशा वाईट प्रथांचे निर्मूलन करण्याकरिता

The practice of boycott should be completely destroyed | बहिष्काराची प्रथा समूळ नष्ट व्हावी

बहिष्काराची प्रथा समूळ नष्ट व्हावी

जयंत धुळप, अलिबाग
गेल्या वर्षभर जिल्ह्यात सामाजिक बहिष्कारासारखे वाईट प्रकार घडत आहेत. अशा वाईट प्रथांचे निर्मूलन करण्याकरिता मानवता धर्माचा स्वीकार करुन, त्याचे आचरण करणे अत्यावश्यक आहे. समाजात जगण्याचा हक्क प्रत्येकास आहे आणि त्यास मानवी हक्क आयोगाने संरक्षण दिले आहे. जनतेने सामाजिक बहिष्कारासारख्या प्रथा समूळ नष्ट कराव्या, असे मार्गदर्शन ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केली.
जे.एस.एम.कॉलेजच्या मैदानावर आयोजित अलिबाग नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, प्रकाशभाऊ धर्माधिकारी, अलिबागचे आमदार पंडितशेठ पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग नगरपरिषदेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा समितीच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. नमिता नाईक, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाहक चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, विरोधी पक्षनेते अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी स्मृतीग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
समाजातील अंधश्रद्धा व व्यसनाधीतेच्या अनुषंगाने प्रबोधन करताना आप्पासाहेब म्हणाले, ८० लाखांची गाडी घेतात आणि त्याखाली लिंबू-मिरची बांधतात. त्यामुळे समाज प्रबोधन करुन समाजातील हे अज्ञान दूर करणे आवश्यक आहे. मानसिक दु:ख व मनस्तापातून माणसे व्यसनांकडे वळतात. व्यसनामुळे मानवी आयुष्यातील समस्या सुटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केला.
श्री सदस्यांसारखे शिस्तीचा संप्रदाय अन्य कोणताही नाही. शिस्तीने प्रशासन कसे चालवावे याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी बैठकीतून शिकावे असे प्रतिपादन करुन अलिबागच्या विकासाकरिता निधी आणणार असल्याचे आमदार पंडित पाटील यांनी जाहीर केले. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
(आणखी वृत्त/४)

Web Title: The practice of boycott should be completely destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.