जव्हारमध्ये निघाली प्रभातफेरी
By Admin | Updated: August 16, 2014 01:10 IST2014-08-16T01:10:37+5:302014-08-16T01:10:37+5:30
शहरात एकूण ५१ शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात सर्वात मोठे कार्यालय म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय.

जव्हारमध्ये निघाली प्रभातफेरी
जव्हार : शहरात एकूण ५१ शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयात सर्वात मोठे कार्यालय म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय. शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, मुख्यालय जव्हार यांच्या प्रांगणात अप्पर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते केला.
यावेळी प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी भा.प्र.से. सुशील खोडवेकर, अप्पर निवासी उप जिल्हाधिकारी दत्ता भडकवाड हे त्यांच्या सोबत उपस्थित होते, तसेच जव्हार नगर परिषदेचे नगराध्यक्ष रियाज मनियार यांनी गांधी चौक येथे झेंडा वंदन केले, तसेच सर्व शासकीय कार्यालयातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत विविध कार्यालयासमोर ६८ व्या स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करून आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून मोठमोठ्या घोषणा देत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामील झाले.