लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अटल सेतूची जोडणी थेट वांद्रे- वरळी सी लिंक रोडला देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल मार्ग दोन वर्षांसाठी बंद केला जाणार आहे. त्यानुसार वाहतुकीतही बदल करण्यात येणार आहे.
मुंबई शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रभादेवीचा पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाच्या नियोजित पाडकामाबाबत पोलिसांनी हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. नागरिकांनी हरकती न घेतल्यास १३ एप्रिलनंतरच्या चार-पाच दिवसांत हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
प्रभादेवीतील वाहतूक मार्गात बदल
वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचे पाडकाम केले जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल केला जाणार आहे. मुंबई शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्रभादेवीचा पूल पाडण्यात येणार असून, प्रभादेवी पुलाची पश्चिम वाहिनी बंद केली जाणार आहे. त्यामुळे येथून दादर पश्चिमेकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने टिळक ब्रिजमार्गे जातील. तर प्रभादेवी व वरळीकडे जाणारी वाहने मडके बुवा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भारत माता जंक्शनवरून उजवे वळण मार्गक्रमण करतील. पुलाची पूर्व वाहिनी बंद केल्याने प्रभादेवी पुलामार्गे परेल परिसराकडे जाणारी वाहने संत रोहिदास चौक येथून सरळ वडाचा नाका जंक्शन येथून लोअर परेल पूलमार्गे भारत माता जंक्शन येथून जातील. तर सायन, माटुंगाकडे जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावे वळण घेऊन व्ही. एस. मटकर मार्ग व बाबूराव परुळेकर मार्ग टिळक पुलामार्गे खोदादाद सर्कल येथून जातील, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
नो-पार्किंग मार्गना. म. जोशी मार्ग : आर्थर रोड नाका ते धनमिल नाका आणि एसिक भवन ते वडाचा नाक्यापर्यंत दोन्ही वाहिनीसेनापती बापट मार्ग : संत रोहिदास चौक ते रखांगी जंक्शनपर्यंत दोन्ही वाहिनीमहादेव पालव मार्ग : कॉ. कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) ते शिंगटे मास्तर चौकापर्यंत दोन्ही वाहिनी