पं.स. सभापतींची आरक्षणे जाहिर
By Admin | Updated: February 11, 2015 22:55 IST2015-02-11T22:55:18+5:302015-02-11T22:55:18+5:30
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर तावडे

पं.स. सभापतींची आरक्षणे जाहिर
पालघर : पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या देखरेखीखाली पालघरच्या लायन्स क्लब सभागृहात काढण्यात आली.
पालघर जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई या पंचायत समित्यांपैकी पालघर आणि वसई पंचायत समित्यांचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव होते. इतर डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा या सहा पंचायत समित्यांची सभापतीपदे अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. या सहा सभापतीपदांपैकी तीन पदे महिलांसाठी राखीव असून नागरिकांचा मागास प्रवर्गातील दोन पंचायत समित्यांपैकी एक सभापतीपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी किशोर तावडे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय भडकवाड, तहसीलदार सुरेंद्र नवले यांच्या देखरेखीखाली भगिनी समाजशाळेच्या हिमांशू पाटील व प्रज्ज्वल जाधव या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढून सोडतीला प्रारंभ केला. या वेळी प्रथम मोखाडा, डहाणू व विक्रमगड या तीन पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिलांची आरक्षणे पडली तर तलासरी, विक्रमगड, वाडा या तीन पंचायत समिती सर्वसाधारण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्या. पालघर पंचायत समितीवर सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग तर वसई पंचायत समितीवर महिलांचे आरक्षण झाले.
आठही तालुक्यांतील राजकीय पक्षांकडून योग्य प्रतिसाद न लाभल्याने तुरळक राजकीय पक्ष प्रतिनिधींसमोरच सोडत काढण्यात आली. (वार्ताहर)