लोकमत इम्पॅक्ट; वीजपुरवठा झाला पूर्ववत, कर्मचाऱ्यांनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:04 AM2019-11-03T03:04:06+5:302019-11-03T03:04:15+5:30

सुनील प्रभूंनी घेतली दखल । कर्मचाऱ्यांनी मानले ‘लोकमत’चे आभार

Power supply undone in ration shop of malad | लोकमत इम्पॅक्ट; वीजपुरवठा झाला पूर्ववत, कर्मचाऱ्यांनी मानले आभार

लोकमत इम्पॅक्ट; वीजपुरवठा झाला पूर्ववत, कर्मचाऱ्यांनी मानले आभार

Next

मुंबई : दहा महिने वीजबिल न भरल्याने मालाडच्या शिधावाटप कार्यालयाचा वीजपुरवठा अदानी या वीजपुरवठा कंपनीने खंडित केला होता. यामुळे कर्मचाऱ्यांसह ग्राहकांची गैरसोय झाली होती. ही बाब ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी घेत मध्यस्थी केली आणि ही समस्या सोडवली.

‘मालाड शिधावाटप कार्यालयाची बत्ती गुल’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २ नोव्हेंबर रोजी हे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत प्रभू यांनी याबाबत अदानी वीजसमूहाच्या संबंधित अधिकाºयांशी बोलणी केली. त्यामुळे २३ आॅक्टोबरपासून खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा अखेर शनिवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववत करण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने आठ ते नऊ तास या कर्मचाºयांवर घामाघूम होत काम करण्याची वेळ येऊन ठेपली होती. वीजपुरवठा पूर्ववत केल्याबाबत कर्मचाºयांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
मालाडच्या एस.व्ही. रोड परिसरात हे शिधावाटप कार्यालय असून शे-पाचशे ग्राहक या ठिकाणी येतात. या विभागाचे काम अंधारातच सुरू होते़

लोकांच्या गैरसोयीसाठी मध्यस्थी
मला हा विषय समजला आणि त्यात सामान्य लोकांची गैरसोय अधिक होत असल्याचे लक्षात आल्यावर मी यात मध्यस्थी केली. संबंधित अधिकाºयांशी बोलणी करत या समस्येचे समाधान करण्याची विनंती केली. त्यानुसार शिधावाटप कार्यालयाला कायद्याच्या अंतर्गत राहत बिल भरण्यासाठी काही अवधी देण्यात आला असून त्याचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
- सुनील प्रभू, स्थानिक आमदार

बिल भरण्याचे आश्वासन
आमच्या वरिष्ठांनी संबंधित वीज कंपनीच्या अधिकाºयांशी बोलणी करत विजेचे बिल लवकरात लवकर भरण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आमची गैरसोय मांडत आमच्या समस्येचे समाधान केल्याबाबत लोकमतचे आम्ही आभारी आहोत.
- सचिन झेले, शिधावाटप अधिकारी, मालाड
 

Web Title: Power supply undone in ration shop of malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.