Join us

Mumbai Electricity Cut :स्वयंचलित जनित्रेमुळे पालिका रुग्णालयांतील वीज पुरवठा सुरळीत, पालिका प्रशासनाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:12 IST

Mumbai Electricity Cut : महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खाजगी कोविड रुग्णालयांमध्येही डिझेल साठा पुरेशा प्रमाणात असल्याची व जनित्रे सुरू असल्याची खातरजमा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे  करण्यात येत आहे.

मुंबई - विद्युत वितरण व्यवस्थेतील तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील विद्युत पुरवठा सोमवार सकाळपासून खंडित झाला आहे. मात्र महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये विद्युुत पुरवठा खंडित झाल्यानंतर लगेचच सर्व जनित्रे स्वयंचलित पद्धतीने तात्काळ सुरू झाली. तसेच २४ विभागांमधील यंत्रणा तात्काळ कार्यरत झाली. घनकचरा व्यवस्थापन खात्याने संभाव्य गरज लक्षात घेऊन सर्व विभागांमध्ये डिझेलचा पुरेसा साठाही तात्काळ करवून घेतला. या सर्व उपाययोजनांमुळे महापालिकेच्या सर्व रूग्णालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांसह सर्व खाजगी कोविड रुग्णालयांमध्येही डिझेल साठा पुरेशा प्रमाणात असल्याची व जनित्रे सुरू असल्याची खातरजमा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे  करण्यात येत आहे. त्याचबरोबर इतर खाजगी रुग्णालयांमध्ये देखील काही अडचण आल्यास त्यांनी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयातील रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही व सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :हॉस्पिटलमुंबईवीज