Join us  

ठाण्यातही वीज गेल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 4:44 PM

वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्याचा परिणाम ठाण्यातील अनेक भागांना झाला. त्यातही पाणी पुरवठा देखील खंडीत झाल्याचे दिसून आले. दुपारी ३ नंतर पिसे व टेमघर येथील पंपींग स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रात्री उशिराने शहरातील पाणी पुरवठा कमी दाबाने सुरु करण्यात आला.

ठाणे : कळवा पडघा केंद्रात वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून मुंबईसह ठाणे शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली होती. दुपार नंतर काही भागांचा वीज पुरवठा सुरळीत झाला तर काही भागांमध्ये सांयकाळी उशिरापर्यंत वीजेचा खोळंबा होता. त्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरून काम करणाºया कर्मचाऱ्यांना व आॅनलाईन शिक्षणाचे धडे गिरविणाºया विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याचे दिसून आले. दुसरीकडे ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाºया टेमघर येथील व ठाणे महापालिकेचे व स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपीग यामुळे बंद झाल्याने शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद होता.          महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्कीट १ ची देखभाल दुरु स्ती करत असताना, त्याचा सर्व भार सर्कीट २ वर होता. मात्र, सर्कीट २ मध्ये अचानक बिघाड झाल्याने मुंबई व ठाण्यातील अनेक भागांमध्ये सकाळी १० च्या सुमारास अचानक वीज गुल झाली. त्यात कोरोनामुळे आजही मोठ्या प्रमाणावर वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवीत घरूनच कामे सुरु आहेत. अचानक सकाळपासून बत्ती गुल झाल्याने घरून काम करणाºया कर्मचाºयांची चांगलीच पंचायत झाली आहे. तर, आॅनलाईन शिक्षणाचे धडे गिरविणाºया विद्यार्थ्यांना देखील या बात्तीगुलचा फटका बसला. दरम्यान, ठाणे शहरातील घोडबंदर रोडचा काही भाग, वागळे इस्टेट, बाळकुम ढोकाळी आणि कोपरी, कळवा, मुंब्रा, दिवा यासह इतर भागातील परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु घोडबंदरमधील काही भागांचा वीज पुरवठा सुरळीत होता. तर शहरातील काही भागांचा वीज पुरवठा दुपारी सुरळीत झाला तर काही भागांचा वीज पुरवठा सांयकाळी उशिराने पूर्वपदावर आल्याचे सांगण्यात आले. वीज पुरवठा खंडित झाल्याने रेल्वेसेवेवर देखील त्याचा परिणाम झाला होता.परंतु पडघा येथील एमएसडीसीएल यांच्याकडून होणारा वीज पुरवठा खंडीत झाल्याने टेमघर येथील ठाणे महापालिकेचे व स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपींग यामुळे बंद झाले होते. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर देखील याचा तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले. दरम्यान दुपारी ३ च्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत सुरु झाल्यानंतर पिसे व टेमघर येथील पंपीग सुरु करण्यात आले आहे. परंतु यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून सोमवारी रात्री शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, कोरोनाच्या आजाराने शहरातील विविध भागातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रु ग्ण उपचार घेत आहे. तसेच ठाण्यातील कोव्हिड सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आदी ठिकाणी २५ केव्हीचे व डीझेलवर चालणारे जनरेटरची व्यवस्था करण्यात आल्यामुळे या वीज खंडितचा कुठलाही परिणाम रु ग्णालयावर व तेथील रु ग्णांच्या उपचारावर झाला नसल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी राजू मुरु डकर यांनी दिली. तर, जिल्हा सामान्य रु ग्णालयात देखील जनरेटरची सुविधा असतानाही अधिकची जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लाईट वेळेत आल्याने त्याची आवश्यकता भासली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकापाणी