रोहा एसटी स्टॅण्ड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: November 19, 2014 22:51 IST2014-11-19T22:51:21+5:302014-11-19T22:51:21+5:30
रोहा एसटी स्टँड परिसरात डांबराचा लवलेशही न राहिल्यामुळे स्टँडच्या आवारात भले मोठे खड्डे पडले आहेत.

रोहा एसटी स्टॅण्ड परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य
रोहा : रोहा एसटी स्टँड परिसरात डांबराचा लवलेशही न राहिल्यामुळे स्टँडच्या आवारात भले मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत डेपो मॅनेजर यांच्याकडे चौकशी केली असता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच खड्डे भरण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.
एसटी स्टँड परिसरात अनधिकृत पार्किंगला आळा घालण्यात एसटी प्रशासनाला यश आले. परंतु आवारातील खड्ड्यांमुळे गाडी पकडताना महिला, वृध्द, शाळकरी मुले यांना त्रास होत आहे. काही वेळा पाय मुरगळण्याचे प्रकार घडले आहेत. तरी रोहा स्टँड आवारातील पडलेले खड्डे तातडीने भरण्यात यावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे. खड्ड्यांमुळे पाठीचे आजार बळावत असल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे.