Join us

सायरस मिस्त्री, जहांगीर पंडोल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रात्रीच पूर्ण 

By संतोष आंधळे | Updated: September 5, 2022 18:34 IST

सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचं काल अपघाती निधन झालं होतं.

मुंबई : सायरस मिस्त्री (५४) आणि जहांगीर पंडोल (४९) यांच्या अपघाती निधना नंतर या दोघांचे मृतदेह पालघर पोलिसांनी शवविच्छेदनाकरिता सर जे जे समूह रुग्णालयात रविवारी १२ च्या सुमारास आणण्यात आले होते.  

न्यायवैदक शास्त्र विभागातील डॉक्टरांनी त्या दोन्ही मृदेहाचे शवविच्छेदन रात्री अडीचच्या सुमारास पूर्ण करण्यात आले आहे. जे जे रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरीरावर अनेक जखमा असल्याचे डॉक्टरांना आढळून आले असून अधिक तपासाकरिता व्हिसेरा जतन करून ठेवण्यात आला आहे. 

त्या दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर ते मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा पर्यंत नातेवाईक मृतदेह घेऊन जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :सायरस मिस्त्रीअपघात