पोस्टाची तिजोरी तलासरीत लांबविली

By Admin | Updated: September 12, 2014 01:54 IST2014-09-12T01:54:22+5:302014-09-12T01:54:22+5:30

लासरी बाजारपेठेमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयातील लोखंडी वजनी तिजोरी एका चोरट्यांनी बुधवारी रात्री लांबवली.

The postal safe is kept in Tulsi | पोस्टाची तिजोरी तलासरीत लांबविली

पोस्टाची तिजोरी तलासरीत लांबविली

तलासरी : तलासरी बाजारपेठेमध्ये असलेल्या पोस्ट कार्यालयातील लोखंडी वजनी तिजोरी एका चोरट्यांनी बुधवारी रात्री लांबवली.
पोस्ट कार्यालयाचे छत फोडून अज्ञात चोरट्यांनी पोस्ट कार्यालयात प्रवेश केला व भिंतीमध्ये बांधकाम करून बसविलेली तिजोरीच चोरट्यांनी लांबविली. चोरट्यांनी तिजोरी घेऊन जाताना बाजुला बंद असलेल्या टीडीसी बँकेच्या दरवाजा फोडून त्यामार्गे पळाले. तिजोरी मध्ये पोस्ट कार्यालयाचे कागदपत्र जवळपास २२ हजाराची रोख रक्कम तसेच ३३ हजाराचे पोस्ट तिकिटे, तसेच धनादेश, सर्टीफिकेट होती. आज सकाळी पोस्ट कर्मचारी कामावर आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. याबाबत तत्काळ तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास पोलीसांनी सुरू केला. पोस्टातील वजनदार लोखंडी तिजोरी चोरट्यांनी पळविल्याने तलासरी मधील व्यापारी व नागरीकांमध्ये घबराट पसरली असून पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी जनतेने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The postal safe is kept in Tulsi